शिंगंकाड्या पुंजाजी
शिंगंकाड्या पुंजाजीपुंज्यानं झाकटीतच तमरेट घेऊन घरामांगचा नाला जोळ केला. दोन मिनीटात तरातरा तमरेट हलवत एका हातात बाभूयची दात घासायसाठी काडी व दुसऱ्या हातात भलामोठा लाकडाचा फाटा वढत वढत तो रस्त्यानं चालला होता. तेवढ्यात त्याले आपल्या घराच्या समोर वाडग्यात बुढीनं वाऊ घातलेल्या पऱ्याटीच्या इंधनाच्या कवट्यावर कुत्रं पाय वर करून मुततांना दिसलं.त्यांन दुरूनच हातात गोटा घेऊन "झऊ लेकाचा लाळ सायाचं तं,तथी आलं सती पळाले " आलेलं कुत्रं त्याच्या अवाजानंच भो-- पयालं. तापावर अंग शेकत बसलेल्या झिंगाजीनं त्याले "जरासक आंगगींग शेकसान की नाही पुंजाजीबुवा" म्हणत हाक मारली."असं म्हणताच दोन मिनिटं तमरेट खाली ठेवत पुंजाजी घडीभर तथीसा थांबला."परसाकडे गेलो होतो दिसलं झोळपं हे,म्हटलं बुढीले सयपाक पाण्याले कामी पळते;कामा- धंद्याच्या गरबळीत बुढीले कायले तरास तीले"असं म्हणताच झिंगाजीनंही मंग न राहवत
"लयच गरबळ दिस...
