जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!
जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यायले पाहिजे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्या सोबतच पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.* नियमित पाणी पिण्याचे फायदे
◆ आपण अनेक तास कामाच्या गडबडीत पाणी न पिता राहतो. उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
◆ सकाळी उठून सर्वप्रथम पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. तसेच पोटातील आम्ल शांत होण्यास मदत होते आणि स्टोन बनत नाही.
◆ सकाळी उठल्या बरोबर कमीत कमी दोन ग्लास ...

