पिक्चर रस्त्यावरचा…
पिक्चर रस्त्यावरचा...आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रो हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका द...
