Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे मानवी आयुष्यातील सेवाधर्माला एक उदात्त,अत्युच्च अस्थान प्राप्त करून एक पवित्र रहस्यमयी ब्रिदवाक्य आहे.त्याला अनुसरून आजही अनेक उच्चशिक्षित सेवाव्रती जीवनातील मानवतावादी तत्वज्ञानाचा अंगीकार करून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.
रूग्णांना व्याधीमुक्त आणि त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यांनाही नव्या जीवनाचा उपहार प्राप्त करून देणे हे समाजातील काही डॉक्टरांचे प्रभावी मानवसेवी कार्य आजही सुरू आहे.याच तत्वप्रणालीने विधायक आणि विनम्र सेवाभावी वृत्तीची कसं धरून आपण अत्यंत जटील अशा मानसिक आजार निवारणाच्या निदान आणि उपचार क्षेत्रात एक सामाजिक आणि आध्यात्मिक सेवक म्हणून सक्रिय आहात. आयुष्यात प्राप्त या मौलिक उपलब्धींबध्दल आपणास अभिमानंदनासह सन्मानित करण्यात येत आहे. हे ...


