पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?
वास्तविक पाहता पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ, विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का? कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद पुराण, - उपनिषद - अरण्यक- मनूस्मृती या तमाम ब्राम्हणी वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही. तसेच विठ्ठल हे नांव रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही. विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठलाचे कोठे ही नांव नाही. तर ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे.विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळण...
