नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा
"नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा"मंगयवारचा गावच्या आठवडी बजार असल्यानं,पायटीच रामभाऊनं ढोराईले गव्हाणीत आदल्या दिवशी कापून आणलेल्या गावरान कडावूचे धांडे लाकडावर कुऱ्हाडीनं बारीक गेंडुरे करून ढोराईपुढे टाकले व गवत कापाचे ईवे वयनाटीतून काढून घराजोळच्या नालीच्या कोपऱ्यावर ठेवलेल्या खरपाच्या गोटयावर साजरे खराखरा घासले. तसा त्या खरपाच्या गोटयाचा उपयोग कोणाचे ट्रॅक्टर, आऊतभांडे,बैलबंडया, ढोरवासरं घराच्या ओट्याले शेंदून जाऊ नये म्हणून त्यानं नालीवर बरोबर बसवले होते. ओटयासमोर इलेक्ट्रीकचा लोखंडी पोल व त्या पोलच्या व भिंतीच्या बरोबर मधात इंधनकाडीसाठी वावरातून तोडून आणलेले मोठमोठे लाकडाचे फाटे व्यवस्थीत रचून ठेवलेले. समोर गाईवासराचे दोन खुटे दिवसभर रिकामेच असायचे.कारण गावचा दल्लारवाला म्हणजे ढोरं वयणाऱ्याकडं गाय, वासरू त्यानं हप्त्यावारी बऱ्याच दिवसांपासून टाकलेले. त्यामुळे दिवस...
