अनाथांची नाथ बोहणी.!
अनाथांची नाथ बोहणीउत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असा पूर्वीचा काळ होता, काळ बदलत गेला तसं उत्तम नोकरी व कनिष्ठ शेती असा बदल झाला, पण व्यापार तेव्हाही मध्यम होता आणि आजही मध्यमच आहे मग व्यापारी तो कोणताही असो अगदी छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत चहाच्या टपरी पासून ते मोठ्या दुकानदारापर्यंत, रस्त्यावरील भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या मार्केटमधील व्यापाऱ्यापर्यंत हा मध्यम दर्जातच येतो. याच प्रत्येक व्यापाऱ्याची दुकानदाराची रोजची कमाई असते त्यांना मासिक पगार नसतो. रोजच्या रोज होणारी कमाई त्यालाच काही लोक ताजा पैसा बोलतात, त्याच ताज्या पैशातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात रोज सकाळी दुकान उघडलं की देवपूजा करतात अगरबत्ती लावतात देवाला दिवा लावतात, मनोभावे दर्शन घेतात त्यानंतर वाट बघतात ते गिऱ्हाईकाची, पहिले गिऱ्हाईक आले की वस्तू किंवा जो काही माल देतात आणि पैसे घेतात, ते पैसे हातात घेऊन दु...