Wednesday, November 5

Tag: नाट्यप्रेमी

नाट्यप्रेमी करजगाव…!
Article

नाट्यप्रेमी करजगाव…!

नाट्यप्रेमी करजगाव...! करजगावातील नागरिकांना आपली रोजची कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडून आलेला थकवा शिनभाग घालवण्यासाठी आणि आपले जीवन सुखी समाधानाने घालविण्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने होती. भजन , किर्तन, प्रवचन, रामलीला, कटपुतली , लोकगीते, लोकनृत्य, दंढार, कलापथक, जलसे, तमाशे याद्वारे गावातील प्रत्येक जण आपले मनोरंजन करून घेत असे त्याच प्रमाणे नाटक सुद्धा करजगावकरांचे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. नाटकाद्वारे समाजातील वाईट प्रथा, परंपरा ,सामाजिक प्रश्न याबाबत जनजागृती होऊन सामाजिक परिवर्तनाला मोलाची मदत झाली. मागील आठ दशकापासून करजगावला नाटकाची परंपरा लाभली. या काळात वेगवेगळ्या नाट्य मंडळाद्वारे प्र .के. अत्रे ,बाळ कोल्हटकर , मधुसूदन कालेलकर या सारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या सामाजिक विषयावरील अनेक नाटकांचे प्रयोग येथे करण्यात आले.करजगावात नाटकाची सुरुवात 1950 पूर्वीचं झाल्याचे दिसून येत...