Sunday, October 26

Tag: #नाचगाणे

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल
News

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल

धाराशिव: मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकं, घरं आणि जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक कुटुंबं उघड्यावर पडली आहेत, तर शेतकरी घरदार सांभाळण्यासाठी धडपडत आहेत.अशा वेळी नागरिकांना प्रशासनाची मदत अपेक्षित असताना, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ समोर आला. हा कार्यक्रम तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी फक्त उपस्थिती लावली नाही, तर गाण्यांवर ठेका धरतानाही दिसल्या, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.घटस्थापनेच्या रात्री आणि त्यानंतरच्या दिवसांत आलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पुराचे दृश्य दिसत होते. शेतकरी पिके, जनावरं आणि घरं पाण्यात बुडत होती, पण त्याच दि...