ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...

