दही रोज खा, आरोग्यदायी रहा! जाणून घ्या दह्याचे अनोखे फायदे!
दही हे भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जेवणात दह्याला नेहमीच स्थान असतं. केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही दही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळेच दह्याला सुपरफूड म्हटलं जातं. दह्यात प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले जिवाणू असतात, जे आपल्या पचनसंस्थेला निरोगी ठेवतात. याशिवाय कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशिअम या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले दही शरीराला उर्जा देतं, हाडे मजबूत करतं आणि एकूण आरोग्य सुधारतं.रोज दही खाल्ल्यास अनेक प्रकारे शरीराला फायदा होतो. सर्वात आधी, दह्याचे सेवन हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पोषक घटक शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर दह्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय...
