डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन "
----------------------------------------
प्रा. डॉ.नरेश शंकरराव इंगळे
मु. भांबोरा ता. तिवसा
जिल्हा अमरावती.
मोबाईल- ९९७०९९१४६४
----------------------------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध असे पैलू आहेत.मानवाचा सर्वांगीण विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने विविध विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण असे भाष्य केले.एकाच वेळी सामाजिक परिवर्तन आणि जातीय निर्मूलनाची लढाई लढताना त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाकडे येनकेन प्रकारे विसर पडल्यागत झाला. थोर समाजसुधारक,शिक्षणतज्ञ,उत्तम पत्रकार,भारतीय घटनेचे शिल्पकार,महिला व बहुजन समाजाचे उद्धारकाबरोबरच ते एक उत्तम अर्थशास्त्री सुद्धा होते.त्यांचा अर्थशास्त्रीय व्यासंग आणि अभ्यास व्यापक स्वरूपाचा होता.त्यांच्यातील अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अतिशय सुस्पष्ट आणि भारताच्या सर्वांगी...
