मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं. परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं दे...





