स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचाल
स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचालभारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची धोरणे राबवली जात होती. शिक्षणाचा प्रसार केवळ उच्चवर्ग आणि काही शहरांपुरता मर्यादित होता. ग्रामीण भाग, महिलावर्ग, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने शिक्षण हा राष्ट्रनिर्मितीचा प्रमुख आधारस्तंभ मानून त्यात सातत्याने सुधारणा केल्या.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा हक्क दिला. कलम २१(अ) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार देण्यात आला. शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा देणे ही भारताच्या शैक्षणिक प्रगतीतील एक ऐतिहासिक पायरी ठरली.स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये देशातील साक्षरतेचे प...
