Sunday, October 26

Tag: #डहाणू रेल्वे घटना

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव
News

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभवपालघर : रविवार दुपारी डहाणू रोड स्थानकाजवळ मुंबई-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये घडलेली घटना प्रवाशांसाठी अक्षरशः थरारक ठरली. दुपारी साडेदीडच्या सुमारास ही गाडी डहाणू स्थानक ओलांडून थोड्याच अंतरावर गेली असता अचानक कपलिंग तुटले आणि गाडीचे दोन डबे मागे राहिले. इंजिनासह अठरा डबे वेगाने पुढे धावू लागले. क्षणभर प्रवाशांना काहीच कळेना; गाडी दोन भागांत विभागल्याचे लक्षात आल्यानंतर डब्यांमध्ये आरडाओरड सुरू झाली. भीतीपोटी काही प्रवाशांनी थेट खाली उड्या मारल्या.सुदैवाने त्या वेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे गाडी काही अंतरावर थांबवण्यात आली. परंतु तोपर्यंत प्रवाशांचा जीव अक्षरशः अडकल्यासारखा झाला होता. काही क्षणांसाठी डहाणू परिसरात रेल्वे अपघात झाल्याचीच चर्चा रंगली....