वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?
वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?एक टॉवेल जास्तीत जास्त किती दिवस वापरलेला चांगला?आपण सगळेच सकाळी उठल्यावर दात घासणे, आंघोळ करणे या क्रिया करतो. काही जण तर संध्याकाळी ऑफीसमधून किंवा बाहेरुन घरी आल्यावरही पुन्हा आंघोळ करतात. आंघोळ झाली की अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हे टॉवेल टर्किस, कॉटन, पंचा अशा विविध कापडाचे, आकाराचे आणि रंगांचे असतात. लहान मुलांसाठी नेहमीपेक्षा थोडे सॉफ्ट टॉवेल वापरले जातात तर काही जण आवर्जून जास्त खरखरीत असणारे टॉवेल वापरतात. काही जण रोजच्या रोज हा टॉवेल धुवायला टाकतात तर काही जण २ ते ३ दिवस वापरुन टॉवेल धुतात हॉस्टेलमध्ये राहणारी किंवा बॅचलर मंडळी तर ८ दिवस एकच टॉवेल वाळवून पुन्हा पुन्हा वापरतात.आरोग्याच्या दृष्टीने हे फारसे चांगले नसते कारण त्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. टॉवेल धुणे आणि मग वापरणे ही एक बाब झाली पण काही जण टॉवेल चांगला टिकला...
