ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर
----------------------------------------
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या नेत्रदिपक कार्यकर्तुत्वामुळे ज्या विद्वानाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले व संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचे स्थान अग्रस्थानी आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रखर वाणी व धारदार लेखणीतून ज्यांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळावा, प्रत्येकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावे, यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातले त्या ज्ञान सूर्याचा आज जन्मदिवस.भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील लोकांच्या जीवनात असलेल्या अंधाराला प्रकाशाकडे नेण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. ज्या महान व्यक्तीने आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष...
