भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी
भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी(नाशिक जिल्ह्यातील कादवा शिवार दिवाळी अंक २०२३ च्या मुखपृष्ठावर टाकलेला प्रकाश)सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी फराळाची रेलचेल घेऊन आली. स्वयंपाकघरातील गृहिणींच्या हाताची चव फराळातून दिसून येत आहे... जून्या जाणत्या स्वयंपाकीण काकूंकडून नव्याने लग्न होऊन आलेल्या नववधू दिवाळीला फराळ शिकून घेतांना दिसल्या तर काही नववधूंनी माहेरात घेतलेलं अस्सल पाककलेचे कौशल्य सासरी अगदी सराईतपणे फराळ करून घरच्या आपल्या माणसांना खायला लावून त्यांच्या जिभेवर माहेराच्या फराळाची चव कशी रेंगाळत राहिल याची दक्षता घेतांना दिसून आल्या.....दिवाळी सण तसा ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो.... वर्षभर शेतीमध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांना, सुनांना, जावयांना वर्षाअखेरीस गोडधोड खायला घालून, रंगबेरंगी वस्त्राने शरीर आणि मन प्रसन्न करण्यासाठी हा दिवाळीसण साजरा क...