आणि कविता जिवंत राहिली.!
आणि कविता जिवंत राहिली.!आणि कविता जिवंत राहिली... ही माझी वास्तव वादी लिहिलेली कथा व्हॉट्स अप वर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाली..अनेकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.कौतुक केलं..ही कथा व्हॉट्स अप वर फिरत फिरत जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टर असलेल्या ताईंच्या व्हॉट्स अप वर गेली.. त्यांनी ती वेळ काढून शांतपणे वाचली.गंमत अशी झाली होती.गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे मिस्टर आणि त्या दोघेही वेगळे झाले होते.त्यांचे मिस्टर सुध्दा डॉक्टर आहेत.ते पुण्यात असतात.करिअर दोघांच्याही आड येतय आणि इतर काही अडचणी यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टात रीतसर अर्ज केला आहे.त्यांची तारीख सुरू आहे.लवकरात लवकर घटस्फोट घेवून दोघेही वेगळे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.माझी कथा वाचल्यानंतर त्य...

