Wednesday, January 28

Tag: #जिल्हाधिकारी

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल
News

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल

धाराशिव: मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकं, घरं आणि जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक कुटुंबं उघड्यावर पडली आहेत, तर शेतकरी घरदार सांभाळण्यासाठी धडपडत आहेत.अशा वेळी नागरिकांना प्रशासनाची मदत अपेक्षित असताना, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ समोर आला. हा कार्यक्रम तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी फक्त उपस्थिती लावली नाही, तर गाण्यांवर ठेका धरतानाही दिसल्या, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.घटस्थापनेच्या रात्री आणि त्यानंतरच्या दिवसांत आलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पुराचे दृश्य दिसत होते. शेतकरी पिके, जनावरं आणि घरं पाण्यात बुडत होती, पण त्याच दि...
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश
Article

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेशजिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश कोण घेतात ?तर याचे उत्तर गोरगरिबांची मुले व ग्रामीण भागातील मुले जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतात. हे वास्तव सत्य आहे.एवढेच कशाला जिल्हा परिषदांमध्ये शिकविणारे शिक्षक देखील आपल्या मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमामध्ये केजी वन व केजी टू मध्ये करतात मात्र अंगणवाडीमध्ये करत नाहीत. किंवा सरकारी शाळांमध्ये करत नाही हे कटू सत्य आहे.मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना अंगणवाडी मध्ये दाखल करून लोकशिक्षण आणि समानतेला प्राधान्य दिला.यातून मिताली सेठी यांनी फार मोठा आदर्श व प्रेरणादायी संदेश दिला आहे.मिताली सेठी या तरुण आयएएस अधिकाऱ्यांपै...