जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!
इंदूर : नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवन आणि आरोग्याबद्दल जागरूकता हे सर्व असूनही एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खातीपुरा परिसरातील 32 वर्षीय संदीप या तरुणाचा जिममधून परत आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.मंगळवारी संध्याकाळी संदीप नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने अंडा हाफ फ्राय खाल्लं. त्यानंतर काही क्षणांतच त्याला छातीत दुखायला लागलं, जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आहे.संदीप गेल्या सहा वर्षांपासून नियमित व्यायाम करत होता. फिटनेस आणि आहाराबाबत तो अत्यंत शिस्तप्रिय होता. त्याचा अकाली मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरल...
