जिद्दीची जादूची पेटी!
जिद्दीची जादूची पेटी!शंभर वर्षांपूर्वीची वैद्यकीय दुनिया आजच्या तुलनेत अगदी निराधार होती. विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. ती बाळं इतकी लहान, अशक्त आणि कुपोषित असायची की त्यांचं जगणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. डॉक्टर आणि नर्सेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या हातात कोणतंही प्रभावी साधन नव्हतं. त्या काळात जन्म झाल्यानंतर उष्णता टिकवू न शकणाऱ्या बाळांपैकी तीन बाळं तर सरळ गमवावी लागायची. आणि या भयंकर परिस्थितीला, वैद्यकीय क्षेत्राने “हे नैसर्गिक आहे” असं मान्य केलं होतं.सगळेजण तेच मान्य करत असताना एक डॉक्टर मात्र या समजुतीशी पूर्णपणे असहमत होते डॉ. एतिएन टार्नियर. एके दिवशी त्यांनी शेतात कोंबडीला तिच्या अंड्यांना उब देताना पाहिलं, आणि त्याच क्षणी एक साधा पण विलक्षण प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जर कोंबडी उब देऊन अंड्यातील जीव वा...
