Monday, October 27

Tag: चुंबळ  

  चुंबळ  
Article

  चुंबळ  

  चुंबळ  शेजारी बांधकाम सुरु आहे. बांधकामाची वाळू आणि कच यांचे ढीग बांधकामाच्या ठिकाणी टाकले आहेत. पाऊस पडल्याने कच आणि वाळू ओली झाली आहे. मुलांना वाळूत खेळायला आवडते. मुले वाळूच्या ढिगावर खेळत होती. मी शेजारी उभे राहून त्यांचा खेळ पाहत होतो. त्यांचा खेळ पाहताना अचानक माझी नजर एका गोलाकृती वस्तूवर गेली. जवळ जाऊन ती वस्तू पाहिली तर ती चुंबळ होती.. बांधकामासाठी वापरलेल्या सिमेंटच्या गोण्याची चांगली चुंबळ तयार केली होती. भक्कम व जाड दोऱ्याच्या मदतीने ती चुंबळ तयार केली होती.. बांधकाम मजूर महिला वरच्या मजल्यावर विटांची वाहतूक डोक्यावर विटा घेऊन करत होत्या. एका लाकडी फळीवर जवळपास दहा बारा विटा ठेऊन त्या डोक्यावर घेऊन वरच्या मजल्यावर जात होत्या..विटाची फळी घेऊन वर जाताना त्या फळीच्या खाली ती चुंबळ त्या ठेवत होत्या..त्यांची ती चुंबळ होती. काम झाल्यावर त्यांनी ती बांधकामाच्या ठिकाणी ठेवली होत...