चकवा…
चकवा...उन्हाळ्याचे दिवस.सकाळपासूनच ऊन रगेल बनायचा. सकाळी सकाळी पक्षांच्या किलबिलाट ऐकू यायचा ;पण उन्हाचा पारा चढाय लागला की पक्षी एखाद्या दाट झाडामध्ये फांदीवर बसुन आराम करायाचे.विशेष करून बाभळीच्या खोडावर बसलेले विशिष्ट किडे मात्र किर्र किर्र असा आवाज करुन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याराला भंडावून सोडायचे.आमच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती.दोन दोन तीन तीन दिवस जेवायला मिळू नये .माझ्या दादाला त्या काळी किती रुपये दिले होते हे मला माहित नाही ;पण आमचे बा वर्षभरासाठी बोली करुन बाबशेटवाडी या गावात एका सावकाराकडे गायी म्हशी राखण्यासाठी माझ्यापेक्षा मोठया भावाला नोकर म्हणून ठेवला होता. त्यावेळी माझ्या दादाच वय असेल जेमतेम आठ नऊ वर्षाचं.मी दादापेक्षा तीन वर्षानी लहान. दादा गावात रहात असल्यामुळे त्याला मराठी भाषा बोलता यायची ;पण मला मराठी भाषा समजत नव्हती व बोलताही येत नव्हती.एकदा दादा त्याच्या ...
