अशी घ्या गरोदरपणात काळजी
अशी घ्या गरोदरपणात काळजी
कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदर मातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदर मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे.
गरोदरपणातील काळजी
बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18...




