घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
घरापासून स्मशानभुमीपर्यंत.! आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं. पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी...
