Sunday, October 26

Tag: घराच्या

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 
Article

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा गोष्ट मे महिन्यातील आहे.रविवारचा दिवस होता.सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो. आणि हिने मागून बडबड सुरु केली. “ जरा जीवाला चैन नाही माझ्या.जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात.नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.” मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी.का चिडली आहेस.?” तर हीचे डोळे भरलेले.मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला..?”  भेळ पाणीपुरी तिला आवडतं.म्हणलं खायची का भेळ..?तर म्हणाली “हितं खाऊन काय करू..?” मी म्हणलं मग कुठ खायची आता..? तर म्हणली, “पुण्याच्या सारस बागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात.” “पण तुम्ही सतत कार्यक्रमात.सतत चळवळीत.आता पोरं पण मोठी व्हायला लागली.सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला.चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”    मी किक मारली.गाडी सुरू केली.ती माग...