घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव
घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तवआज बर्याच आत्महत्या होत आहेत. काही घटस्फोटातून आहेत व वाटायला लागलं आहे की घटस्फोट हा गुन्हा आहे की यल्गार? खरं तर घटस्फोट व्हायला हवेत. पती पत्नीचं जर एकमेकांशी पटत नसेल तर..... परंतु कधीकधी घटस्फोट हे वेगळ्याच कारणानं होतात. जेव्हा कधीकधी विवाहाचा वापर हा खावटी म्हणून पैसा कमवून ऐषआरामात जीवन जगण्यासाठी केल्या जातो. काही वेळेस विवाह हे खावटी मिळवून ऐषआरामाचं आयुष्य जगण्यासाठी केले जात असल्याचं निदर्शनास येतं. अशाच कारणातून कधीकधी आत्महत्या वा खुनासारखे कृत्य घडून येतात. ज्यातून स्वतः जन्मास घातलेली मुलंही सुटत नाहीत. आज बर्याच आत्महत्या होत आहेत. कधी शेती पिकली नाही म्हणून. कधी परीक्षेत नापास झाले म्हणून. कधी प्रेमभंग झाला म्हणून तर कधी कोणी कोणाला छळलं म्हणून. परंतु पती पत्नी वितुष्टातून आत्महत्या झालेल्या जास्त करुन कोणी ऐ...
