अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब
अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उबअंगण सांगे घराची कळापूर्वी कितीही छोटी घरे असली तरी त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण अंगण असायचं.आता काळाच्या ओघात अंगण नावाचं घर नामशेष होत चाललं आहे.जी काही थोडीफार अंगणे उरली आहेत त्यांनी ही आपापली सीमा कुंपणात बंदिस्त करून घेतली आहे.म्हणजे त्यात मोकळेपणा असा उरलेला नाही.पूर्वी अंगणं सजायची माणसांनी आणि बहरायची प्राजक्ताच्या सड्यांनी.उन्हाळा सुरू झाला कि वाळवणं करायची लगबग असायची अंगणात.भल्या पहाटे चुलांगण पेटून त्यावर आधन ठेवलं जायचं आणि मग तो चिक हटणं असो नाही तर मग सोऱ्याने कुरडया करायच्या असो. सगळं अंगण आया बायांनी भरून जायचं,कुणाला वेगळं आमंत्रण द्यायची कधीच आवश्यकता वाटत नसायची. अंगणासाठी सीमा ठरलेली नसायची.तशीच ती सीमारेषा माणुसकीसाठी ही नसायची.रात्रीच्या उकाड्यात तर अंगण हीच हवेशीर ...

