Sunday, October 26

Tag: ग्रंथ-

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!
Article

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..! महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतवासीयांना मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ -संविधान हा आपल्या खडतर प्रवास आणि प्रदीर्घ लेखणीतून बहाल केला आहे* सन 2015 सालापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो. ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. हा मानवी जीवन कल्याणाचा दिवस आहे. भारतात हजारो ग्रंथ असताना दीन-दलित, भटके विमुक्त, आदिवासी दीनदुबळे लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान होय. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी होऊन त्यामध्ये आठ महत्त्वाच्या समित्या बनवल्या. त्यामध्ये *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती देण्यात आली.* 29 ऑगस्ट 1947 रोजी समिती गठित करण्यात आली. मसुदा समितीकडे आलेल्या सर्व दस्तऐवजाचा डॉक्टर बा...