Sunday, October 26

Tag: #गौरव प्रकाशन

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश
Article

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेशदिवाळीत केवळ भौतिक दिवे न लावता प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम, करुणा आणि सौहार्दाची ज्योत पटवण्याचा हा सण आहे.दिवाळीचे खरे महत्त्व फक्त दिवे लावणे किंवा मिठाई खाणे एवढेच मर्यादित नाही. हा सण आपल्या जीवनात ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये दिवाळीचे वर्णन अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा त्रिपक्षीय विजय म्हणून केले आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या मानसिक आणि सामाजिक जीवनात संतुलन आणि प्रेरणा आणणारा सण आहे. दिवाळीच्या वेळी आपल्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये दिसणारा तेज आणि उत्साह केवळ शारीरिक प्रकाश नसून आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे.या दिवाळीत "मानवतेची ज्योत पटवण्याचा" संकल्प करू या.हा स...
तळेगावची धग…
Article

तळेगावची धग…

तळेगावची धग...मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ' धग ' कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ...
मराठीची उंची मोठी करूया!
Article

मराठीची उंची मोठी करूया!

मराठीची उंची मोठी करूया!मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या...