Sunday, October 26

Tag: गौरवगीत

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत
Article

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत प्रत्येक जीवा जीवाची भावना, आचारविचार आदानप्रदान करण्याची एक शैली असते तिलाच आपण भाषा असे म्हणतो. प्रत्येक पशुपक्षी, प्राण्यांची सुध्दा एक भाषा असते. भलेही त्यांची भाषा आपल्याला कळत नसेल; परंतु त्यांची भाषा त्यांना मात्र कळते कारण त्याद्वारे ते त्यांचा जीवन व्यवहार व्यतित करित असतात. जगात मानव जात ही सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान गणल्या गेली; याचे कारण म्हणजे मानवाला निसर्गाने प्रदान केलेले बुध्दी चातुर्य होय. मानवाने आपली स्वतःची एक भाषा विकसित केली. त्या माध्यमातून तो विचारांची आदानप्रदान करायला लागला. जगात आज अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकीच एक आगळीवेगळी, स्वतंत्र असलेली भाषा म्हणजे बंजारा समाजाची मातृभाषा होय. पुरातन काळापासून हा समाज आपल्या मायड भाषाला (मातृभाषा) आजतागायत जीवापाड जपत आला आहे. मग भलेही आजपर्यंत कित्येक स्थित्यंतरे झाली असत...