Sunday, May 3

Tag: #गावाकडच्या_आठवणी #बाजा #ग्रामीणजीवन #मराठीकहाणी #nostalgia #villageLife #MarathiStory #IndianCulture #oldMemories #ruralIndia

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी
Article

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणीआमच्या भल्या मोठ्या अंगणात शेतीचं सामानसुमान, अडगळ,फाटा,वरवंटा,उखळ,जातं तुरीच्या कनोराची पोती काही धान्याच्या मातेराची पोती पडलेली असायची. त्यात विशेष भर म्हणजे या बाजांची असायची. ‌बाज हा प्रकार सर्रास अजूनही खेड्यात बघायला मिळतो. आमचं एकत्र मोठं कुटुंब असल्याने व सभासद संख्या जास्त असल्याने झोपायची चांगलीच पंचाईत होती. पावसाळयात आम्ही माडीवर सातऱ्या वाकया घेऊन निजायला जायचो. एकत्र कुटुंबात तीन आत्या,आबा,आजी दोन काका त्यांच्या बायका लेकरं,बाकरं, भरपूर ढोरंवासरं असं खंडीभर कुटुंब नक्कीच होतं. प्रत्येकाची कामं वाटून देलेली होती. त्यामुळे कुरबुरीला जागा नव्हती. कोणी भांडे घासायचं तर कोणी इंधनफाटा आणायचं तर कोणी जनावरांचा शेणपवटा,झाडझूड करायचं. कोणी बाजारहाट करून ढोरं चारायचं. तर कोणी खटल्यात हप्त्यावारी कामाला...