Monday, October 27

Tag: #गावगाडा#अलुतेदार#बलुतेदार#ग्रामीणसंस्कृती#भारतीयग्रामव्यवस्था#पारंपरिकव्यवस्था#महाराष्ट्राचासंस्कार#गावगाड्याचासांगाती#ग्रामजीवन#सामाजिकइतिहास#सामाजिकइतिहास

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ
Article

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभगावगाडयाला महत्वाची सेवा पुरविणाऱ्या सोबत्यांपैकी अलुतेदार व बलुतेदार हा समाजाला वा गावरहाटीला सेवा पुरविणाऱ्या जातींचा एक समूह आहे.हा वर्ग गावरहाटीची कामे करून लोकांना सुविधा पुरविण्याचे पिढीजात काम करतो.यांचे महाराष्ट्रातील प्रमाण अत्यल्प म्हणजेच ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्गामध्ये मोडतो. या अलुतेदारांनाच ’नारू’ असे म्हणतात.कासार,कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी, या अठरा गाव कामगारांचा समावेश गावगाडयात अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत व गावरहाटीमधे महत्त्वाचा वाटा होता.अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :कळवंत, खाटीक, गोंधळी,...