Saturday, October 25

Tag: #गावखेड्याचीदिवाळी #ग्रामीणदिवाळी #मराठीसंस्कृती #दिवाळीच्याआठवणी #सणआणिपरंपरा #मराठीलेख #वसुबारसतेलक्ष्मीपूजन #गौरवप्रकाशन

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य
Article

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्यनवरात्रं पार पडलं की दसरा दणदण करत यायचा.दसऱ्याच्या दिवसी घराला आंब्याच्या पानांची तोरणं दोऱ्यात ओवून बांधायची‌. चार,पाच झेंडूच्या फुलांईचा हार करायचा.आपटयाची पाने तोडायले जाऊन ती घरी आणायची.व संध्याकाळी जेवणं झाली म्हणजे घरातली म्हातारी माणसं प्रशस्त आंगनात सुताचा तडव आथरून दसऱ्याच्या सोनं देण्याची वाट बघायची. बाजूला पानपुळा सुपारी अडकित्ता असायचा.येणाऱ्या, जाणाऱ्यांची ख्यालीखुशाली ईचारून पानसुपारी खाण्याचा आग्रह करायची.किती दिलदार लोकं होती ही.दसरा पार पडला म्हणजे पंधरा दिवसावर दिवाई रोरो करत यायची.आमच्या गावाकडच्या दिवाईत मस्त व आगळीवेगळी मजा होती राजेहो. घरातल्या सगळ्या सातऱ्या वाकया,गोधडया धान्य, मिरच्या साजऱ्या उन्हात वाऊचिऊ घालायचं काम चालायचं.महिन्याभरा पूर्वीच गवंडयाच कुटार गारा करून त्यात तुडवून,कालवून साजरू मूरू द...