शेतकऱ्यांचे गाडगेबाबा…
शेतकऱ्यांचे गाडगेबाबा...संत गाडगेबाबानी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत प्रचंड योगदान दिले आहे.त्यांची सामाजिक क्रांती अनुयायांनी खराट्यात बंदिस्त केली. त्यामुळे त्यांनी दिलेली सामाजिक क्रांतीची हाक ऐकण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला.त्यांच्या आंदोलनास वेगवेगळे क्रांतिकारी पदर आहेत. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील महाभयानक अन् तितक्याच क्रूर टोळ्यांना त्यांनी आपल्या प्रखर वाणी अन् कृतीतून उध्वस्त केले. संत गाडगेबाबांनी ज्या वर्गासाठी लढाई उभी केली तो वर्ग इथला कृषक अर्थात शेतकरी वर्गच होता. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगात शेतकऱ्यांविषयी जो कळवळा होता तोच कळवळा संत गाडगेबाबांच्या मांडणीत दिसून येतो. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीचे आंदोलन होते.शेतकरी शहाणा व्हावा, तो धार्मिक अन् आर्थिक शोषकांच्या तावडीत सापडू नये यासाठीच संत गाडगेबाबांनी ...

