साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!
साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!साहित्य ही बाब प्रत्येक वेळी सहज निर्माण होत नाही. त्यासाठी आपल्या मनातील भावना, वैचारिक पातळी, योगायोग या गोष्टींना फार महत्त्व आहे. आपण एखाद्या गोष्टीला जसे जाणून बुजून घडवून आणू शकत नाही. तसेच, चांगल्या साहित्याची निर्मिती केवळ खेचून ताणून निर्माण होऊ शकत नाही.एखादी कविता आपण लिहित असताना त्या कवितेमध्ये आशय गर्भता, हळुवारपणा, सहजता, चंचलता येण्यासाठी अनुभव, शब्दरचना, शब्दसंपदा, अलंकार यांची सुयोग्य निवड कवितेला मोकळे रान मिळवून देते. पण तरीही हा विचार अचानकपणे समोर आल्यावर तीच रचना अगदी साध्या भाषेत गोड वाटू लागते. साहित्य लिहिण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. तुम्ही कुणाला घाबरवून, भीती दाखवून साहित्य निर्मिती करू शकत नाही. तसे साहित्य निर्माण होईल पण, ते साहित्य मनाला स्पर्श करणार नाही. त्या साहित्यामध्ये जिवंतपणा नसेल. जसे आपण म्हणतो मूर्त...
