पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!
पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!
"मला पडलेला प्रश्न , जे लोक स्वतःला सुशिक्षित समजतात कुत्रे वागवतात आणि सकाळी फिरायला निघतात आणि कोणाच्या घरासमोर , कोणाच्या दुकानासमोर ते कुत्र घाण करते, है योग्य आहे का , जर कुत्र वागवायची आवड आहे तर ते कुत्र्याला घाण सुद्धा स्वतःच्या घरातच करायला शिकवा, माझा हा विचार चुकीचा की बरोबर......"
समाजात संवेदनाशील लोक अजुनही आहेत. स्वतः बद्दलच्या इतकीच काळजी त्यांना समाजघटकाबद्दल असते. त्यांचे निरीक्षण अतिषय सूक्ष्म असते. समाजविघातक काही दिसले की काळजीपोटी ते उव्देगाने व्यक्त होत असतात. व्यक्त होण्याची भाषा वरदर्शनी मवाळ वाटत असली तरी एखाद्या किळस येणाऱ्या कृतीचा प्रचंड संताप आल्यावर ही ते संयमीत व्यक्त होत असतात. वरील पोस्ट कुणबी समाज बांधव, श्री. रविंद्र फाटे यांची आहे. त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. माहितीतल्या व्यक्तिंना ते चांगले ठाऊक आहेत...
