कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा
कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळाकुंभारी तांडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) प्रतिनिधी : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी संघटनेतर्फे कुंभारी तांड्यावर सामाजिक भान, प्रेरणा आणि एकतेचा अनोखा मेळ साधणारा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गावातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा, नवीन शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा, तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तांड्याचे नायक श्री. सुधाकर राठोड यांनी भूषविले, तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव राठोड यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (सहसचिव, अखिल भारतीय तांडा सुधार समिती) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, एमपीएससी, पोलीस भरती आणि उच्च शिक्षणाच्या संधींवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि ...
