Thursday, December 4

Tag: काय

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?
Article

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?आई-वडीलांना ‘तुम्ही आमच्यासाठी काय केलं ?असा प्रश्न विचारण्याच्या आधी थोडा या गोष्टींचा विचार करा 'आई-वडील' हे दोन शब्द ऐकले की मनात एक वेगळाच भाव उमटतो. आपण कोणत्याही वयाचे असू, कितीही मोठे झालो तरी, आई-वडीलांसाठी आपली जागा कधीही बदलत नाही. परंतु कधीकधी, परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे, आपल्याला असे वाटू शकते की आपल्या आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं? हे विचारताना त्यांच्या कष्टांचा आणि त्यागाचा आपल्याला विसर पडतो.त्यामुळे हा लेख लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपण त्या क्षणांची आठवण ठेवावी आणि त्याचं मोल समजावं. आईच्या पोटातून जन्म घेताना आपल्या आईला किती यातना सोसाव्या लागल्या असतील, आपण तिला काय काय दुःख दिलं, ते आपल्याला कधीच आठवत नाही. पण ती आई, जिचं शरीर, मन, आत्मा आपल्यासाठी पूर्णपणे बदलतं, तिने केलेला तो पहिला त्याग आपण...
Article

स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?

स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?१५ ऑगस्ट राष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय? या दिवसाचे महत्त्व कोणाला माहित नाही असे या भारतात तरी शोधून कोणीच सापडणार नाही.! ते तर सर्वांना माहीतच आहे १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, असे कोणीही नाही ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल, परंतु तुम्हाला खरंच असे वाटते का, की आपला देश स्वतंत्र झाला आहे, आम्हा मुलींना तरी असे अजून तरी तसे अजिबातच वाटत नाही...!मुलींनी स्वप्न पाहणे वाईट आहे का? व ते स्वप्न अस्तित्वात आणणे हा गुन्हा आहे का ? स्वप्न पाहणे गुन्हा आहे असेच मला तरी वाटते, प्रत्येक मुलगी घराबाहेर पडण्या अगोदर सतरा वेळा विचार करते मग ती बाहेर पडते त्यात पण एखादा माणूस तिच्याकडे पाहत असला तर ती तिचा अवतार नीट आहे का ते पाहते, कपडे छोटे वाटत आहे का ? घातलेले कपडे खूप फिट आहे का? केस नीटनेटके आहेत का? कुठे काही लागलं आहे का? हे ती बघते परंतु तिच्या वेशभूष...
Article

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य?

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य? नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जाते. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. पण...       ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांनी नटून-थटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढच का जोपर्यंत त्याच्या शरीरावर जडभरीत वस्त्र व प्रसाधनं असते, तोपर्यंत तो थोडा वेगळा वाटतो. ते सर्व उतरल्यावर 'जुनं ते सोनंच...
वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?
Gerenal

वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?

वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?एक टॉवेल जास्तीत जास्त किती दिवस वापरलेला चांगला?आपण सगळेच सकाळी उठल्यावर दात घासणे, आंघोळ करणे या क्रिया करतो. काही जण तर संध्याकाळी ऑफीसमधून किंवा बाहेरुन घरी आल्यावरही पुन्हा आंघोळ करतात. आंघोळ झाली की अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हे टॉवेल टर्किस, कॉटन, पंचा अशा विविध कापडाचे, आकाराचे आणि रंगांचे असतात. लहान मुलांसाठी नेहमीपेक्षा थोडे सॉफ्ट टॉवेल वापरले जातात तर काही जण आवर्जून जास्त खरखरीत असणारे टॉवेल वापरतात. काही जण रोजच्या रोज हा टॉवेल धुवायला टाकतात तर काही जण २ ते ३ दिवस वापरुन टॉवेल धुतात हॉस्टेलमध्ये राहणारी किंवा बॅचलर मंडळी तर ८ दिवस एकच टॉवेल वाळवून पुन्हा पुन्हा वापरतात.आरोग्याच्या दृष्टीने हे फारसे चांगले नसते कारण त्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. टॉवेल धुणे आणि मग वापरणे ही एक बाब झाली पण काही जण टॉवेल चांगला टिकला...
मधमाशी चावल्यावर काय होतं?
Article

मधमाशी चावल्यावर काय होतं?

मधमाशी चावल्यावर काय होतं?डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्ती पासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते.तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुई सारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्या बरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो.असं करत ते सुईला कातडी पार करून ...
अपेंडीक्स म्हणजे काय ?
Article

अपेंडीक्स म्हणजे काय ?

अपेंडीक्स म्हणजे काय ?अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपे...