बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !
बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !खुशियों का कल ढूंढना होगा,
बेरोजगारी का हल ढूंढना होगा,संसदेत २ तरुणांनी घुसखोरी केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. घडलेला प्रकार खूप विचित्र, दहशत पसरविणारा असाच होता. घटना कोणतीही असो, दोनही बाजूने अर्थात घटनेचे समर्थन करणारे आणि घटनेच्या विरोधात बोलणारे, प्रतिक्रिया देणारे असतात. संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपी तरुण-तरुणी यांचे बाबतीत बोलतांना काँग्रेस नेते माजी खासदार मा. राहुलजी गांधी यांनी ‘देशात बेरोजगारी हा मोठा मुद्दा असून बेरोजगारीतून या तरुण-तरुणींनी असे कृत्य केले’, असे म्हटले. मात्र हा राजकीय भाग झाला. सरकार विरुध्द कोणत्याही घटना व प्रकाराचे, आंदोलनाचे सरासरी समर्थन करणे, हीच विरोधी पक्षाची भूमिका असते, असो..भारतातील बेरोजगारीचा दर जानेवारी २०२३ मध्ये ७.१४ टक्के होता, तो पेâब्रुवारी २०२३ मध्ये ७.४५ टक्के तर जुलै २०२३ मध्ये ...
