काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव
काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सवकाकड आरतीचं स्वरूप खुप प्राचिन आहे.या काकड आरतीला नुसते आध्यात्मिक महत्त्व नसून त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात प्राणवायू ओझोन भरपूर प्रमाणात असतो. म्हणून आपले ऋषीमुनी एवढंच नाही तर सम्पूर्ण प्राणीमात्र भल्या पहाटे उठतात.काकडा आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली विनवणी होय.या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भल्या पहाटे आंघोळ संडासंमार्जन, रांगोळया काढून सम्पूर्ण गावातून नामाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात येते ग्रामीण व शहरी भागातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.ही अनेक वर्षांपासूनची ही प्रथा, पंरपरा आजही जोपासली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष...
