तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!
तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची..आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय.घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं
एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी...
