Monday, October 27

Tag: कर्तव्य… 

शिक्षक अन कर्तव्य… 
Story

शिक्षक अन कर्तव्य… 

शिक्षक अन कर्तव्य...        बाजारातल्या कोपऱ्यात बसून उम्या आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. "अरे ही चप्पल शिवायची आहे"      समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली. "तुम्ही चोरगे सर ना?" त्याने विचारलं. "हो.तू?"       "मी उम्या, उमेश कदम.कल्याणी शाळेत दहावी अ च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी  शिकवायचे."       "बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" चोरगे  सर त्याला निरखत म्हणाले.       "असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन" "पण तू हा व्यवसाय का.....?"        "सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय." "काय झालं वडिलांना?        "सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामु...