करजगावची गुजरी अन् गावकरी
करजगावची गुजरी अन् गावकरी चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील पाटील, बौद्ध, बंजारा व इतर समाज येथे गुण्यागोविंदाने नांदतात. आजपर्यंत कोणत्याही दोन गटात वाद पेटल्याचे ऐकिवात नाही. किरकोळ वाद असतातच ! तसा इथला वर्ग शेती, शेतमजुरी करून आपली गुजरान करतो. गावात पूर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची आधुनिक सोय नसल्याने बोदेगांव पर्यंतचा प्रवास हा बैलगाडी, अथवा पायदळ किंवा वरुडखेड येथून शकुंतला रेल्वेने असायचा. आता तर शकुंतला पण बंद पडली आहे. सुमारे 1990 च्या दशकात दारव्हा-तेलगव्हाण ही बससेवा सुरु झाली. सुरुवातीपासूनच गावकर्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन तीन किलोमिटरचा पाणी प्रवास हा जीवघेणा वाटतो...!हे वाचा - करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणेगावातील मुली लग्...

