Monday, October 27

Tag: #ओला दुष्काळ

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Article

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन
News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, भात, भाजीपाला आणि फळबागांसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले श्रम वाया गेले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसध्या राज्यभरातून १०० टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ...