मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!
मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!कोल्हापूर : “मटण खाल्लं पण उधारी गिळली!” हे वाक्य सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरशः हेडलाईन बनलं आहे. बहिरेश्वर गावातील चिकन-मटण विक्रेता सदल्या काशिद यांनी उधारी वसुलीसाठी घेतलेली हटके शक्कल आता चर्चेचा विषय ठरली आहे.ग्राहकांकडून उधारी वसूल होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सदल्या काशिद यांनी थेट गावाच्या चौकात डिजिटल बोर्ड लावून सर्वांना इशारा दिला आहे. या बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे —“उधारी लवकरात लवकर जमा करा, अन्यथा दिवाळीमध्ये उधारीवाल्यांची नावं बोर्डवर झळकतील!”या इशाऱ्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांनी कधी ‘फक्त थोडीशी उधारी’ केली होती, त्यांनाही आता आपलं नाव बोर्डावर येईल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे.कोल्हापूर हा रस्सा आणि मटणासाठी प्रसिद्ध जिल्हा. पण आता इ...
