Thursday, January 15

Tag: #आयुष्याचीफाईल #भावनांचेव्हायरस #जीवनाच्यारिस्टार्ट #गजाननहरणे #प्रेरणादायीलेख #सकारात्मकविचार #मनाचाक्लीनअप #LifeRestart #MarathiMotivation #MentalHealthMarathi

आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!
Article

आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!

डिजिटल माणसाचं भावनिक हँग होणं ,आजचा माणूस डिजिटल जगात सर्वाधिक ‘कनेक्टेड’ आहे, पण भावनिकदृष्ट्या सर्वाधिक ‘डिस्कनेक्टेड’.स्मार्टफोन हातात असला तरी, मनाचं नेटवर्क वारंवार ‘नो सिग्नल’ दाखवतं. बाहेरून तो स्मार्ट, स्टायलिश आणि ‘अपडेटेड’ दिसतो, पण आतून त्याचं मन मंदावलेलं, थकलंलेलं, हँग झालेलं असतं.असं का?कारण आयुष्याच्या फोल्डरमध्ये नकोशा फाईल्स साचल्या आहेत. तक्रारी, कटुता, ईर्षा, अपयशाच्या आठवणी, तुटलेल्या नात्यांचे स्क्रीनशॉट्स.या सगळ्या फाईल्सचा भार मनाच्या रॅमवर पडतो आणि आत्म्याची सिस्टीम संथ होते.माणूस स्वतःचा यूजर राहिलेला नाही, तर स्वतःच्या विचारांचा बळी झालेला आहे.अशा वेळी आवश्यक असतं  “मनाचा क्लीनअप आणि जीवनाचा रिस्टार्ट!” कर्म नियतीच्या सर्व्हरवरील खरी ओळख“कुणी बघत नाही म्हणून मनाप्रमाणे वागावं”  हा विचार मोहक आहे, पण त्यात विनाश लपलेला आहे.कारण नियतीचा सर्व्हर नेहमी ऑ...