Neet : आधी ‘नीट’ला नीट समजून घ्या…
आधी 'नीट'ला नीट समजून घ्या... मगच 'नीट'चा नीटपणे विचार करा !'नीट'ची स्वप्ने रंगवण्यापूर्वी एकत्र बसून'नीट'चे मृगजळ नीट समजून घ्या! नीट मध्ये जेमतेम मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांपासून पाचशे मार्का पर्यंत पोहोचलेल्या अनेकांची घोर निराशा झालेली सापडते. तर 600 पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांची सरकारी एमबीबीएस कॉलेज मिळणार की नाही याची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. याच वेळी पाच जून पासून सर्वच वृत्तपत्रात विविध क्लासेसच्या जाहिराती ठळकपणे येत आहेत. टीव्हीवर नीट रिपीट करण्यासाठी वेगळ्या बॅचेसचे आवाहन सतत दाखवले जात आहे. या गदारोळात मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. ते कोणते यावर सविस्तर माहिती जाणकार पालकांना मिळावी एवढाच या लेखाचा हेतू. यंदा दहावीचे निकाल लागले आहेत. अनेक पालकांनी नीट साठीचे क्लासेस सुरू केलेले आहेत. बारावीचे व नीट चे निकालानंतर पुन्हा नीट देण्य...
