आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस
आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस
स्थापना : २० जुलै १९०८बँक ऑफ बडोदाची स्थापना बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड महाराजांनी २० जुलै १९०८ मध्ये केली. बडोदा मधील बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्या मध्ये बडोद्या मधली पहिली बँक सुरु झाली. सयाजी गायकवाड महाराजांनी बँक ऑफ बडोदाची पहिली डिपॉजीट करून बँकेची अधिकृत सुरवात केली होती. कोणताही राजा त्याकाळी बँक वगेरे काढत नसे, पण सयाजीराव यांची दूरदृष्टी होती की, त्यांनी अर्थकारणाला चालना देण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शाश्वत दिशेनी पावलं टाकली. महाराजांच्या डोक्यात बँकेचा विचार येताच त्यांनी गुजरात मधील बड्या व्यावसाईकाना विश्वासात घेतले. त्यात संपतराव गायकवाड, राल्फ व्हाईटन्याक, विठलदास ठाकरसी, तुलसीदास कालीचंद आणि एन.एम. चोक्सी ही सर्व मंडळी होती. त्यावेळी तत्कालीन गुजरातचे अर्थकारण याच लोकांभोवती फिरत होते त्यामुळे चाणाक्ष महाराजां...